Gold-Silver Rates: 740 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

Gold-Silver Rates: 740 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

सध्या सगळ्यांनाच आर्थिक फटका बसल्याने लोक पुर्वीसारखीच खरेदी करतील का हा प्रश्न सर्व व्यापाऱ्यांना पडला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 3 जुलै: सोने आणि चांदीच्या भावांमध्ये (Gold-Silver Rates)  आतंरराष्ट्रीय बाजारात फारसे चढ उतार झाले नाहीत. दिल्लीतल्या सराफा बाजारात आज सोन्याची किंमत (Gold Price) 10 ग्रामसाठी 237 रुपयांनी वाढलीय. चांदीची किंमतीत (Silver Price) एका किलोमागे 740 रुपयांनी घट झाली आहे. (Gold and silver Price on 3rd July 2020)

10 ग्रामसाठी सोन्याचा भाव 237 रुपयांनी वाढल्याने किंमत 49,022वर पोहोचली आहे. गुरुवारी हाच भाव 48,785 एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,774 डॉलर प्रति आउंस एवढा होता.

तर चांदीचा भाव किलोमागे 740 रुपयांनी वाढल्याने 49,060वर गेला आहे. तर गुरुवारी हाच भाव 49,800 एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 17.99 डॉलर प्रति आउंस एवढा होता.

व्यापाऱ्यांच्या मते कोरोना व्हायरस पँडेमिक, भारत-चीन संघर्ष आणि अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढता आहे. जगभरातील मध्यवर्ती  बँकांनी व्याजदर घटवले आहेत.  त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीन यांमधील तणाव वाढत आहे. य सर्वाचा परिणाम मोठ्या प्रमाणात सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

मोदी सरकारच्या या योजनेमुळे 20.41 लाख जणांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार आणि वापरकर्ता देश आहे. सध्या कोरोनामुळे जगभरच मंदीचं वातावरण आहे. अर्थव्यापार ठप्प आहे. भारतात आता Unlockची प्रक्रिया सुरू असल्याने व्यवहार सुरू झाले आहे. हा लग्नसराईचे दिवस असल्याने सोने-चांदी खेरेदी वाढली आहे.

रेकॉर्ड स्तरावर सोन्याच्या किंमती, पहिल्यांदा गाठला 50 हजाराचा आकडा

तर येणारे काही महिने हे सणांचे आहेत. त्या काळातही भारतात सोने आणि चांदीची खेरेदी केली जाते. मात्र सध्या सगळ्यांनाच आर्थिक फटका बसल्याने लोक पुर्वीसारखीच खरेदी करतील का हा प्रश्न सर्व व्यापाऱ्यांना पडला आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 3, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या