Home /News /money /

खूशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, गुरुवारचे दर इथे पाहा

खूशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, गुरुवारचे दर इथे पाहा

गेले काही दिवस भाव चढता राहिल्यानंतर सराफा बाजारात सोन्या- चांदीच्या किमतीत घट झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया पडल्याने हे भाव कमी झाले आहेत. जाणून घ्या आजचे दर

    नवी दिल्ली, 05 मार्च: देशभरात कोरोना व्हायरसची चिंता वाढत असताना गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 157 रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात 99 रुपये प्रति किलो घट झाली आहे. गेल्या बुधवारनंतर सोन्याचा दर वाढताना पाहायला मिळत होता. आता मात्र या दरात घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दराचा हा परिणाम असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याचा दर हा 44,407 रूपये होता. गुरूवारी या दरात घट होवून 44,250 रूपये झाला आहे. सोन्याच्या दरात 157 रूपायांची घसरण झाली आहे. बुधवारी या दरात तब्बल 1,155 रूपयांनी वाढ झाली होती. सोन्यासोबतच गुरुवारी चांदीच्या दरात देखील घसरण झालेली पाहायला मिळाली. दिल्ली सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलो 47,517 रूपये झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी दिल्ली सराफ बाजारत सोन्याची किंमत 157 रुपये प्रति तोळा घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्यानं सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. वाचा: 1000 रुपयाची नवी नोट बाजारात? जाणून घ्या काय आहे सत्य Coronavirus मुळे जागतिक व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या अनेक व्यवसायातील उपक्रम कमी झाले आहेत. व्यवसायातील देवाणघेवाण कमी झाली आहे. याचा परिणाम बाजारपेठांवर झालेला पाहायला मिळतो आहे. आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता असल्यानं सोन्यामध्ये तेजी आली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चीन बाजारपेठा बंद आहेत. यामुळे बाजारपेठांवर प्रामुख्यानं परिणाम झाला आहे. वाचा: Paytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे?
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या