तुमच्या खिशात आहे सोन्याची खाण, कशी ते घ्या जाणून

तुमच्या खिशात आहे सोन्याची खाण, कशी ते घ्या जाणून

सोनं फक्त खाणीत मिळत नाही, तर ते अनेक ठिकाणी असतं. ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 03 मे : तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या खिशात सोन्याची खाण आहे. म्हणजे तुमचा मोबाइल. पण तेवढंच नाही तर तमाम इलेक्ट्राॅनिक सामानात इतकं सोनं असतं की ते अनेक प्रयत्नांनी त्यातून सोनं काढलं जातं. मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटाॅप यासारख्या एक टन इलेक्ट्राॅनिक कचऱ्यातून जवळजवळ 350 ग्रॅम सोनं काढलं जाऊ शकतं. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी समोर आल्यात.

पैसे दुप्पट करणारी अधिकृत योजना, सुरू करा फक्त 1000 रुपयांनी

जाणून घेऊ काही रंजक गोष्टी

वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालामध्ये सांगितलंय की मार्चच्या तिमाहीत टेक्नाॅलाॅजी कंपन्यांनी 79.3 टन सोनं खरेदी केलं.

इलेक्ट्राॅनिक्स कंपनी 62.9 टन आणि इतर इंडस्ट्री कंपनींनी 12.9 टन सोनं खरेदी केलंय. या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत दातांच्या डाॅक्टर्सनी 3.6 टन सोनं खरेदी केलंय.

बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ, नवी आकडेवारी जाहीर

कर्नाटकात सर्वात जास्त सोन्याच्या खाणी आहेत. कोलार, धारवाड, रायचूर या जिल्ह्यांत खाणी आहेत. त्यानंतर सोन्याच्या खाणीसाठी आंध्र प्रदेश, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश इथे सोनं आणि हिऱ्याच्या खाणी आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार 20 टक्के टाकाऊ इलेक्ट्राॅनिक सामान रिसायकल करता येतं. अनेक घरात असं भरपूर सामान सापडतं, जे लोक विसरून गेलेले असतात.

Fani Cyclone : नागरिकांना मदतीचा हात द्या; राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

ई कचरा वाढतोय - संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार 2016पर्यंत जगभरात साडेचार कोटी टन इलेक्ट्राॅनिक कचरा झाला होता. हा कचरा दर वर्षी 3 ते 4 टक्के वाढतोय.

समजा तुम्ही या इलेक्ट्राॅनिक कचऱ्याला 18 चाकी 40 टनांच्या ट्रकमध्ये भराल तर त्यानं 12.3 कोटी ट्रक भरतील. या ट्रक्सना एका रांगेत उभं केलं तर पॅरिस ते सिंगापूरपर्यंत दोन रांगाचा रस्ता भरून जाईल. 2021पर्यंत जगात इलेक्ट्राॅनिक कचरा 5.2 कोटी टनपर्यंत पोचेल.

हा VIDEO पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 'फानी' वादळाची तीव्रता

First published: May 3, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या