खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

Gold,Silver - सोनं-चांदी स्वस्त झालंय. जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : सोन्या-चांदीच्या भावात आज शुक्रवारी घसरण झालीय. दिल्लीत सोन्याच्या भावात 140 रुपयांची घसरण आलीय. तर चांदीही 150 रुपयांनी कमी झालीय. यामुळे आता सोन्याचा भाव 35,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. तर चांदीचा भाव 42,160 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,418.80 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.51 डॉलर प्रति औंस आहे.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 140 रुपयांनी कमी होऊन 35,730 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,560 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. गिन्नी सोन्याची किंमत 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅमवर स्थिर राहिलीय. काल सोन्याच्या किमतीत बदल झाला नव्हता.

रेल्वेची नवी सेवा, फिंगर प्रिंटवरून 'असं' बुक होईल ट्रेनचं तिकीट

चांदीही 150 रुपयांनी कमी झालीय. चांदीचा भाव 42,160 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. साप्ताहिक डिलिवरी चांदीत 287 रुपयांची कमी आलीय. तिचा दर  41,271 रुपये प्रति किलोग्रॅम राहिला.

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 85 हजार आणि 86 हजार रुपये प्रति शेकडा आहे.

LIC ची नवी पाॅलिसी, रोज 28 रुपये करा जमा आणि मिळवा लाखो रुपये

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

हे कार्ड मोफत बनवा आणि 2 लाख रुपयांचा विमा मिळवा

यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असण्याची शक्यता मुंबईतील सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे. दिवाळीपर्यंत सोने 38 हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 45 हजारावर पोहोचू शकतात.

VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 26, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या