मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला झळाळी, आठवड्याभरात मौल्यवान धातुच्या किमती कुठून कुठे

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला झळाळी, आठवड्याभरात मौल्यवान धातुच्या किमती कुठून कुठे

Gold-Silver Price Latest Updates: सणासुदीत तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे.

Gold-Silver Price Latest Updates: सणासुदीत तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे.

Gold-Silver Price Latest Updates: सणासुदीत तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 2 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महाग झाली आहे. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 712 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 964 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (26 ते 30 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 49,590 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,302 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 55,374 रुपयांवरून 56,338 रुपये प्रति किलो झाली आहे.

आयबीजीएने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. आयबीजीएने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. मात्र, किमतींमध्ये जीएसटीचा समावेश नाही.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले

26 सप्टेंबर 2022- 49,590 रुपये प्रति 10 ग्रॅम

27 सप्टेंबर 2022- 49,529 रुपये प्रति 10 ग्रॅम

28 सप्टेंबर 2022- 49,505 रुपये प्रति 10 ग्रॅम

29 सप्टेंबर 2022- 50,003 रुपये प्रति 10 ग्रॅम

30 सप्टेंबर 2022- 50,302 रुपये प्रति 10 ग्रॅम

वाचा - Money Mantra - आर्थिक समस्या येत असल्यास आज करा हे उपाय; दूर होतील अडचणी

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला

26 सप्टेंबर 2022- रुपये 55,374 प्रति किलो

27 सप्टेंबर 2022- रुपये 55,391 प्रति किलो

28 सप्टेंबर 2022- रुपये 54,524 प्रति किलो

29 सप्टेंबर 2022- रुपये 55,658 प्रति किलो

30 सप्टेंबर 2022- रुपये 56,338 प्रति किलो

भारतीय रिटेल ज्वेलरी मार्केटमध्ये चेन स्टोअर्सचा 5 वर्षांत 40% हिस्सा असेल

भारतीय किरकोळ दागिन्यांच्या बाजारपेठेतील रिटेल स्टोअर चेनचा बाजार हिस्सा पुढील पाच वर्षांत 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) अहवालातून ही माहिती मिळाली आहे. एक वर्षापूर्वीपर्यंत, भारतीय रिटेल ज्वेलरी मार्केटमध्ये ज्वेलरी स्टोअर्सच्या साखळीचा वाटा 35 टक्के होता. टॉप 5 रिटेलर्स पुढील 5 वर्षांत 800-1,000 स्टोअर्स उघडण्याची शक्यता आहे. डब्ल्यूजीसीने 'ज्वेलरी मार्केट स्ट्रक्चर' नावाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today