मुंबई : सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याने रडवलं आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर 57 हजारांच्याही वर पोहोचले आहेत. सोन्याचे दर वधारत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. लग्नसराईत सोन्याची मागणी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर बऱ्याचदा वधारल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने आणि चांदी पुन्हा महाग झालं आहे. आज सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 68,700 रुपयांच्या पुढे गेला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव लवकरच 64,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचण्याची शक्यता आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी वाढून 56,745 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होतं. बाजार बंद होत असताना सोन्या-चांदीच्या किंमती आणखी वाढल्या. याशिवाय चांदीही 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 68793 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅंम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,736 | 57,360 |
22 कॅरेट | 5,442 | 54,420 |
20 कॅरेट | 5,171 | 51,710 |
18 कॅरेट | 4,590 | 45,900 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,700
कोल्हापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅंम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,720 | 57,200 |
22 कॅरेट | 5,262 | 52,620 |
20 कॅरेट | ------- | ------- |
18 कॅरेट | 4,462 | 44,620 |
चांदीचे दर प्रति किलो - 69,000
बनावट होलमार्क प्रकरणी मुंबईसह 5 जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅंम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,448 | 54,480 |
22 कॅरेट | 4,995 | 49,950 |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | -------- | -------- |
सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅंम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५७३३ | ५७३३४ |
22 कॅरेट | ५२५४ | ५२५४६ |
20 कॅरेट | ४७७७ | ४७७७१ |
18 कॅरेट | ४२९९ | ४२९९५ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६९०६३
तुमच्याकडील दागिने बनावट होलमार्किंगचे तर नाहीत? कसं ओळखायचं पाहा PHOTO
औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅंम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५,८०० | ५७,८०० |
22 कॅरेट | ५,२०० | ५३,२०० |
20 कॅरेट | ------- | ------- |
18 कॅरेट | ------- | ------- |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today