मुंबई : गेल्या 20 दिवसांपासून सतत सोन्या-चांदीचे दर वधारलेले आहेत. आता मकरसंक्रांतीपासून लग्नाचे मुहूर्त असल्याने सोनं खरेदी करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वधारल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोनं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. ज्यांनी आधी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांची चांदी झाली. मात्र आता नव्याने सोनं किंवा दागिने घेणाऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे.
शेअर मार्केट सुरू होताच सोन्याचे दर आज वधारल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचे दर 57 हजार 406 वर पोहोचले आहेत. तर RTGS आणि GST पकडून 58 हजार 700 हून अधिक दर पोहोचले आहेत. सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. हे दर येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सराफा व्यापारी कुणाल यांनी न्यूज 18 लोकलला सांगितले की, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दर वाढल्यामुळे सराफ व्यवसायिकांना मोठा फायदा झाला आहे. वाढत्या सोन्यामुळे आता लोक सोनं खरेदी करण्यासाठी थोडे हात आखडण्याची शक्यता आहे. यंदाच्या बजेटमध्ये सोन्याच्या दरांबाबत दिलासा मिळेल का हे पाहावं लागणार आहे.
कसे आहेत शेअर मार्केट सुरू होताना सोन्याचे दर
सोनं रिटेल 995 - 57,143
सोनं रिटेल 999 - 57,410
सोनं RTGS 995 - 56,653
सोनं RTGS 999 - 57,068
सोन्याचे दर RTGS आणि GST धरून आजचे दर 995 - 58,352
सोन्याचे दर RTGS आणि GST धरून आजचे दर 999 - 58,784
Gold Rate : लग्नसराईला सोनं पुन्हा रडवणार! 24 आणि 22 कॅरेटचे दर पाहून तुमचं टेन्शन वाढेल
सोन्याचे दर 60 हजारच्या पुढे जाणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही संधी आहे. याशिवाय तुम्ही दागिने करणार असाल तर होलमार्कचे दागिने करा. होलमार्क बनावट नाही ना याची काळजी घ्या.
गुंतवणूकदारांना अमेरिकेत जास्त व्याजदरवाढ होण्याची शक्यता कमी आहे. आता फेडच्या बैठकीच्या इतिवृत्ताकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. फेडच्या बैठकीचे इतिवृत्त ५ जानेवारीरोजी जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणामुळेही सोन्याच्या किमतीला आधार मिळाला आहे. याशिवाय रशिया युक्रेन युद्धामुळे देखील सोनं महाग झाल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today