Home /News /money /

Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढ, दागिने खरेदीसाठी चेक करा नवे दर

Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढ, दागिने खरेदीसाठी चेक करा नवे दर

Gold Silver Price Today: सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 52,663 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे कालच्या तुलनेत आज त्यात 260 रुपयांनी वाढ झाली आहे.

    मुंबई, 8 एप्रिल : सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सकाळी घसरणीसह सोन्याचा भाव 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर, चांदी 101 रुपयांच्या घसरणीसह 66,664 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. तसेच आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 52,663 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे कालच्या तुलनेत आज त्यात 260 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावही आज 250 रुपयांनी वाढला आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 48,250 रुपये आहे. Explainer : ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी परत मिळवता येते का? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर मुंबई : 48250 रुपये (22 कॅरेट) आणि 52630 रुपये (24 कॅरेट) पुणे : 48350 रुपये (22 कॅरेट) आणि 52730 रुपये (24 कॅरेट) नागपूर : 48350 रुपये (22 कॅरेट) आणि 52730 रुपये (24 कॅरेट) नाशिक : 48350 रुपये (22 कॅरेट) आणि 52730 रुपये (24 कॅरेट) कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Silver prices today

    पुढील बातम्या