मुंबई: कोरोना काळात 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार झाले होते. हा 28 महिन्यांपूर्वीचा रेकॉर्ड आज सोन्याच्या दरांनी मोडला आहे. 210 रुपयांनी सोनं वधारलं आहे. 1 ग्रॅम सोन्याचा दर 21 रुपयांनी वधारला आहे. तर 10 ग्रॅम सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. US फेड बँक रेपो रेट पुन्हा वाढवणार का याची चिंता आहे.
एकीकडे मंदीचं सावट आहे तर दुसरीकडे सोनं दिवसेंदिवस वधारत आहे. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील वाढली आहे. त्याच दरम्यान आता सोनं सर्वाधिक उच्च पातळीवर पोहोचलं आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना GST सोडून 56,950 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 52,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
GST आणि RTGS धरुन सोन्याचे दर 58 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 5,220 तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 5,695 रुपये मोजावे लागणार आहेत. GST, TCS दागिन्यांसाठी किंवा बिस्किटावर धरले तर हे दर आणखी वाढतात.
10 दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर - 56,237
20 दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर - 55,717
3 महिन्यांपूर्वी सोन्याचे दर - 53,450
Gold Price Today : रेकॉर्ड ब्रेक! सोन्याचा आणखी एक उच्चांक, किंमत पाहूनच फुटेल घाम
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,655 | 55,160 |
22 कॅरेट | 5,293 | 52,930 |
20 कॅरेट | -------- | --------- |
10 कॅरेट | 4,685 | 46,850 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 67,200
नाशिक सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,698 | 56,980 |
22 कॅरेट | 5,223 | 52,230 |
20 कॅरेट | --------- | --------- |
10 कॅरेट | --------- | --------- |
वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,655 | 56,550 |
22 कॅरेट | 5,359 | 53,590 |
20 कॅरेट | 4,844 | 48,440 |
10 कॅरेट | 4,685 | 46,850 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,200
कोल्हापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,700 | 57,000 |
22 कॅरेट | 5,244 | 52,440 |
20 कॅरेट | ------- | |
10 कॅरेट | 4,446 | 44,460 |
चांदीचे दर प्रतिकिलो- प्रति किलो - 69,500
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today