मुंबई: लग्न सराईत सोन्याच्या वाढत्या किंमतीला आज ब्रेक लागला आहे. बुधवारी सोन्याचे दर 200 रुपयांनी स्वस्त झाले. सोमवारी आणि मंगळवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 56 हजार 900 रुपये मोजावे लागत होते. आज हेच दर घसरले असून 56 हजार 700 वर आले आहेत. येत्या काळात सोन्याचे दर 64 हजारवर पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चांदीचे दर मात्र वधारले आहेत. चांदीचे दर 70 हजारवर पोहोचले आहेत. बुधवारी सकाळपासून चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. चांदी खरेदी करण्याआधी चांदीचे दर चेक करुन जा. याशिवाय इथे दिलेले दर हे GST आणि RTGS वगळून दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करताना यापेक्षा काही रक्कम तुम्हाला जास्त भरावी लागू शकते.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मंगळवारी डॉलर निर्देशांक ०.१८ टक्क्यांनी मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अमेरिकेच्या रोख्यांची कमाईही अलीकडच्या नीचांकी पातळीवरून सावरली आहे.
नाशिक सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,698 | 56,980 |
22 कॅरेट | 5,223 | 52,230 |
20 कॅरेट | ----------- | ----------- |
18 कॅरेट | ----------- | ----------- |
वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,654 | 56,540 |
22 कॅरेट | 5,336 | 53,360 |
20 कॅरेट | 4,812 | 48,120 |
18 कॅरेट | 4,663 | 46,630 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 67,980
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,710 | 57,100 |
22 कॅरेट | 5,423 | 54,230 |
20 कॅरेट | 5,150 | 51,500 |
18 कॅरेट | 4,575 | 45,750 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 70,000
सोलापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५६४२ | ५६४२६ |
22 कॅरेट | ५१७२ | ५१७२२ |
20 कॅरेट | ४७०२ | ४७०२२ |
18 कॅरेट | ४२३१ | ४२३१७ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६९३१३
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,448 | 54,480 |
22 कॅरेट | 4,995 | 49,950 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | ---------- | ---------- |
सांगली शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,510 | 57,000 |
22 कॅरेट | 5,267 | 52,560 |
20 कॅरेट | .......... | .......... |
18 कॅरेट | 4,354 | 44,540 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 70,000
अमरावती सोन्याचे भाव
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५६६० | ५६६०० |
22 कॅरेट | ५२९९ | ५२९९० |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | ४३२० | ४३२०० |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,०००
अहमदनगर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5558 | 55580 |
22 कॅरेट | 5293 | 52930 |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | 4347 | 43470 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 74800
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today