Home /News /money /

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दर घसरला, तपासा 10 ग्रॅमचा लेटेस्ट रेट

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दर घसरला, तपासा 10 ग्रॅमचा लेटेस्ट रेट

ग्लोबल मार्केटमध्ये आलेल्या चढ-उतारामुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी दरावर (Gold-Silver Price) त्याचा परिणाम दिसून आला. भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 1 एप्रिल : ग्लोबल मार्केटमध्ये आलेल्या चढ-उतारामुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी दरावर (Gold-Silver Price) त्याचा परिणाम दिसून आला. भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. सोने दर घसरला असला, तरी अद्यापही 51000 वरच आहे. मल्टी कमॉडिटी एक्चचेंजवर सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा वायदे भाव (Gold Price Today) केवळ एका रुपयाने घसरला असून 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. बाजारात आज सोन्याचा रेट याच दरावर ओपन झाला आणि काही वेळ स्थिर होता. कोरोना काळात सोन्याचा दर रेकॉर्ड स्तरावर होता. 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,700 रुपयांजवळपास होता. चांदीचा भावही उतरला - MCX वर शुक्रवारी चांदीचा वायदे भावही कमी (Silver Price Today) झाला. चांदीचा वायदे भाव 222 रुपयांनी घसरला असून 67,265 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. आज चांदी आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन जवळपास 6 हजार रुपयांहून स्वस्त आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध संपल्यास सोन्याच्या मागणीत कमी येईल आणि किमती कमी होऊ शकतात. भारतीय बाजारात चांदी 66,550 रुपये ट्रेड करेल असा अंदाज आहे. तर सोनं 50,550 रुपये स्वस्त होऊ शकतं असा अंदाज एक्सपर्ट्सने वर्तवता आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकायचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात. युक्रेनने रशियाच्या अटी मानून युद्ध संपवल्याचे संकेत दिले आहेत. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा  - 1 एप्रिलपासून महागाईचा बोजा वाढणार; टीव्ही, AC, फ्रीज आणि मोबाइल सेवेसाठीही लागणार जास्त पैसे

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या