मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोदी सरकारने 2 हजारांची नोट बंद केली म्हणून...जळगावकरांची भारी आयडिया

मोदी सरकारने 2 हजारांची नोट बंद केली म्हणून...जळगावकरांची भारी आयडिया

जळगावमध्ये 2 हजारच्या नोटा खपवण्यासाठी सोनं खरेदी

जळगावमध्ये 2 हजारच्या नोटा खपवण्यासाठी सोनं खरेदी

2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याऐवजी लोकांनी मात्र सोन्याच्या दुकानात गर्दी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदुरकर प्रतिनिधी जळगाव : मोदी सरकारने अचानक 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद अशी घोषणा रात्री केली आणि खळबळ उडाली आहे. नोटा बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस बँक आणि काही छोट्या मोठ्या केंद्राकडे लोकांना जाण्याचं आवाहन करण्यात आलं. 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याऐवजी लोकांनी मात्र सोन्याच्या दुकानात गर्दी केली.

एकीकडे 20 हजारपेक्षा जास्त नोटा असतील तर बदलण्यासाठी द्यावा लागणारा कर आणि दुसरीकडे वेळेचा अभाव असल्यानं तासंतास बँकेत उभं राहाणं शक्य नाही ही तक्रार त्यामुळे बऱ्याच लोकांची पावलं सराफ दुकानाकडे वळली आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांनी घसरण झाली. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्यात घसरण झाल्याने ग्राहक सोनं खरेदी करत आहेत. सराफ बाजारात तेजी आली असून मोठी उलाढाल होत आहे. दुसरीकडे लग्नासाठी सोनं घ्यायचं आणि आयत्या घरात 2 हजाराच्या नोटा आहेत त्यामुळे लोकांनी ही संधी साधून लग्नाही खरेदीही करून घेतली आहे.

Jalgaon Gold Silver Rate : 2 महिन्यांत पहिल्यांदा एवढे घसरले सोन्याचे दर, खरेदीसाठी उडाली झुंबड

जळगावमधील लोकांनी तर भन्नाट आयडिया लढवली आहे. एका ग्राहकाने सांगितलं की बँकेत आम्हाला रांगेत बराच वेळ उभं राहावं लागतं. त्यापेक्षा आम्ही घरी असलेल्या 2 हजारच्या नोटा एकत्र करुन त्यातून मुलीसाठी दागिना घेतला. तर दुसऱ्या एका महिला ग्राहकाने सांगितलं की तिचे लग्न ठरले होते, 2000 च्या नोटा उपलब्ध होत्या त्यामध्ये तिने दागिने करुन घेतले.

गुरुपुष्यामृत योगमुळे सराफ बाजारात गर्दी, 2 हजाराने स्वस्त झालं सोनं

जळगावला सोन्याची सुवर्णनगरी म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत मुहूर्ताला तर मोठा प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यात आली. आज 700 रुपयांनी पुन्हा सोनं स्वस्त झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Money, Money18