नवी दिल्ली, 30 मे : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सध्या चढ-उतार सुरू आहे. आज रविवारी (Gold Rate Today) सोन्याच्या किंमतीत किंचितशी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 10 रुपयांनी वाढून 46,590 झाला आहे. त्याचबरोबर आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,590 रुपये आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, काल सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,580 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी वाढीपेक्षा सध्याचे सोन्याचे दर (Gold Rate) अजूनही 9 हजार रुपयांपेक्षा खालीच आहेत.
गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार 4 मेट्रो शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत -
दिल्लीमध्ये ते प्रति 10 ग्रॅम - 46,760 रुपये आहे.
मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅम 46,590 रुपये.
चेन्नईमध्ये ते 46,120 रुपये आहे
कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 48,170 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
दिल्लीमध्ये दर 10 ग्रॅम 50,760.
मुंबईत प्रति 10 ग्रॅम 47,590 रुपये.
चेन्नई मध्ये 50,310
कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 50,750 रुपये आहे.
चांदीची किंमत
दिल्लीमध्ये प्रति 1 किलो 71,600 रुपये.
मुंबईत प्रति 1 किलो 71,600 रुपये.
चेन्नईमध्ये प्रति 1 किलो 76,200
कोलकातामध्ये हा दर प्रति 1 किलो 71,600 रुपये आहे.
अशाप्रकारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) द्वारे ग्राहक (Consumer) सोन्याची शुद्धता (Purity) तपासू शकतो. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकतो असे नाही तर खरेदी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास ती देखील अॅपद्वारेच करू शकता. या अॅपमध्ये, वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची काय करावे याचीही सविस्तर माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.