नवी दिल्ली, 11 मार्च : सोन्याच्या किंमती वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच बुधवारी दरात मोठी घसरण झाली आहे. भारतीय चलन रुपयाची किंमत वधारल्यानं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर 516 रुपयांनी कमी झाला. सोन्याची किंमत कमी झाली तर चांदीचे भाव वाढले. दिल्लीत बुधवारी एक किलो चांदीच्या दरात 146 रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर बाजारातील उलाढालीचा परिणामामुळे सोनं स्वस्त झालं. सोमवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी 45 हजार 33 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
दिल्लीतील सराफ बाजारात बुधवारी सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅममागे 516 रुपयांनी कमी झाली. यामुळे सोन्याचा दर 44 हजार 517 रुपये इतका झाला. सोमवारी हाच दर प्रति 10 ग्रम 45033 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात हाच दर प्रति औस 1661 डॉलर इतका आहे.
सोन्याचे भाव कमी होत असताना चांदीने मात्र उसळी घेतली आहे. दिल्लीतील सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलोमागे 146 रुपयांनी वाढला आहे. यामुळे चांदी 47 हजार 234 रुपयांवर पोहोचली. सोमवारी चांदी 47088 रुपये प्रतिकिलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति औस 17.03 डॉलर इतका आहे.
हे वाचा : SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका! FD वर मिळणार आता ‘इतकं’ कमी व्याज
सोन्याचे दर कमी होण्यामागे अमेरिकन डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत कमी होणं हे असल्याचं सांगितंल जात आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी वधारला. याशिवाय जागतिक स्तरावर पोषक वातावरणामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
हे वाचा : आता तुमच्या बॅंक चेकमध्ये होणार मोठा बदल, RBI आणणार नवीन सिस्टम मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.