Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण, सोनं तीन महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर; चेक करा नवे दर
Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण, सोनं तीन महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर; चेक करा नवे दर
सोन्यासोबत आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली आणि त्याची फ्युचर किंमत 60 हजारांच्या जवळ पोहोचली. सकाळच्या व्यवहारात चांदी 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर विकली गेली.
मुंबई, 11 मे : जागतिक बाजाराच्या दबावाखाली बुधवारी सकाळी सोन्याचा फ्युचर्स भाव (Gold Price Today) तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. लग्नसराईच्या हंगामातही सोन्याचा भाव 50 हजारांच्या आसपास पोहोचला असून, चांदीची विक्री 60 हजारांच्या आसपास होत आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत सकाळी 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आजच्या व्यवहारात सोने 50,445 रुपयांवर खुले होते, परंतु मागणी कमी झाल्याने ते 0.45 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले.
चांदीही स्वस्त झाली
सोन्यासोबत आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आणि त्याची फ्युचर किंमत 60 हजारांच्या जवळ पोहोचली. सकाळच्या व्यवहारात चांदी 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर विकली गेली. चांदीने आज 60,525 रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू केला, परंतु विक्री वाढल्याने त्याची किंमत लवकरच 0.46 टक्क्यांनी घसरून 60,338 वर आली.
खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारही चिंतीत; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितली दर कमी करण्यासाठी काय असेल रणनिती?जागतिक बाजारातही भाव कमी झाले
जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. अमेरिकन सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. येथे सोने प्रति औंस $1,832.06 वर विकले गेले. चांदीची स्पॉट किंमतही 0.1 टक्क्यांनी घसरून 21.23 डॉलर प्रति औंस झाली. याशिवाय इतर मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार दिसून आले. जिथे प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी वाढून 964.64 डॉलरवर आणि पॅलेडियम 1.2 टक्क्यांनी घसरून 2040.25 डॉलरवर पोहोचला.
PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या अनेक सुविधांच्या शुल्कात बदल, चेक करा नवे नियमसोन्याच्या दरात घसरण का?
अमेरिकेतील बॉन्ड यील्ड 20 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे आणि चलनवाढीचे आकडे देखील संध्याकाळी उशीरा येणार आहेत. यापूर्वी गुंतवणूकदार अत्यंत सावध दिसत होते आणि त्यांनी सोने-चांदीची खरेदी कमी केली आहे. डॉलरच्या दरातही काहीशी घसरण झाली असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. याशिवाय IMF ने यावर्षी जागतिक विकास दर कमी केल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होत आहे.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.