या आठवड्यात काय आहेत सोन्याचांदीचे दर? इथे वाचा संपूर्ण अपडेट

या आठवड्यात काय आहेत सोन्याचांदीचे दर? इथे वाचा संपूर्ण अपडेट

या आठवड्यात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 207 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती प्रति किलो 251 रुपयांनी वाढल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : या आठवड्यात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) प्रति तोळा 207 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती (Silver Price) प्रति किलो 251 रुपयांनी वाढल्या आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किंमती दररोज चढउतार पाहायला मिळाला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 24 रुपये प्रति तोळा किरकोळ किंमतीने वाढले होते. ज्यानंतर किंमत प्रति तोळा 52,465 रुपये झाली होती. सोमवारी चांदीचे दर 222 रुपये प्रति किलोने वाढून चांदी 69,590 रुपये प्रति किलो झाली होती.

मंगळवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 422 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर सोन्याचे दर 53,019 रुपये प्रति तोळा किंमतीवर पोहोचले होते. मंगळवारी सोन्याचे दर वाढले होते कारण डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉझिटिव्ह ट्रेड पाहायला मिळाला होता. त्यादिवशी चांदीचे भाव 1,013 रुपयांनी वाढल्याने चांदीची किंमत प्रति किलो 70,743 रुपये झाली होती.

(हे वाचा-मोदी सरकार 'महिला स्वरोजगार योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवणार 1 लाख?)

गुरुवारी सोन्याचे दर 608 रुपयांनी घसरले होते. यानंतर किंमत 52,463 रुपये प्रति तोळावर आली होती. दरम्यान यादिवशी चांदी देखील 1,214 रुपयांनी उतरली होती. चांदीमध्ये ही मोठी घसरण झाल्याने चांदीची किंमत 69,242 रुपये प्रति किलोवर आली होती.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर एकूण 224 रुपये प्रति तोळाने वाढल्या आहेत. शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळा 52,672 रुपयांवर पोहोचले आहेत. तर शुक्रवारी चांदीचे दर 620 रुपये प्रति किलोने वाढले आहेत, परिणामी चांदी 69,841 रुपये प्रति किलो दरावर पोहचली आहे.

(हे वाचा-खूशखबर! 30 टक्के स्वस्त होतील नवीन कार, सरकार लवकरच लागू करणार ही पॉलिसी)

आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये झालेली वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मुल्य या मौल्यवान धातूंच्या किंमतीवर परिणाम करत आहे. जगभरात चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा मोठा खरेदीदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी लावण्यात येतो. भारतात यावर्षी सोन्याची किंमत जवळपास 30 टक्क्यांनी वाढली आहे. भारतात सोन्याची आयात ऑगस्टमध्ये वाढून 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी गेल्यावर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलर होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 6:14 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या