Home /News /money /

Gold Price: सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमसाठीचा भाव

Gold Price: सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमसाठीचा भाव

अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या निवडीने आणि प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेमुळे, दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : सोन्याच्या दरात (Gold Rate) सलग चौथ्या दिवशीही झळाळी पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्योरिटीजद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याच्या दरात 277 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीचे दरही (Silver Rate) 650 रुपये प्रति किलोग्रॅमने वधारले आहेत. अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या निवडीने आणि प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेमुळे, दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सोने दर Gold Price, 9 November 2020 : सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 277 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्यामुळे, सोन्याचा दर 52,183 रुपयांवर पोहचला आहे. याआधी शुक्रवारी, सोन्याचा दर 51 हजारांच्या घरात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1960 रुपये प्रति औंस होता. (वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स) चांदीचा आजचा भाव Silver Price, 9 November 2020 : सोन्याप्रमाणे चांदीचे भावही वधारले आहेत. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 650 रुपये प्रति किलोने वाढून 65,699 रुपये इतका झाला आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 65,005 रुपये इतका होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 25.75 डॉलर प्रति औंस होता. (वाचा - 100 रुपये बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही) एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनलिस्ट्स कमोडिटीज तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देशात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामुळे, सोन्याच्या दरात वाढ होत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची कमजोरी, बायडन यांची राष्ट्रपतीपदी निवड आणि त्याअंतर्गत प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेदरम्यान सोन्याचे भाव वधारले असल्याचं, मोतिलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेजचे कमोडिटी रिसर्च वीपी नवनीत दमानी यांनी सांगितलं.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या