नवी दिल्ली, 15 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात 4 कामकाजाच्या सत्रानंतर मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात (Gold Rates Today) तेजी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 514 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. चांदीचे दर तर 1000 पेक्षा जास्त भावाने वधारले आहेत. एक किलो चांदीची किंमत (Silver Rates Today) 1,046 रुपये प्रति किलोने वाढली आहे. याआधी सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 48,333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 62,566 रुपये प्रति किलोवर होती. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे भारतात सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 15th December 2020)
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 514 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर दिल्लीमध्ये 48,874 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी दर 48,333 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,845 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
(हे वाचा-खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल, वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा)
चांदीचे आजचे भाव (Silver Price on 15th December 2020)
चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 1,046 रुपये प्रति किलोने महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 63,612 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चांदीचे दर 23.16 डॉलर प्रति औंस आहेत.
(हे वाचा-LPG Gas Cylinder Price: सामान्यांचं बजेट कोलमडलं! पुन्हा महागला घरगुती गॅस)
का वाढले सोन्याचांदीचे भाव
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडंट (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांच्या मते, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 8 पैशांची तेजी आली आहे. त्याचप्रमाणे सोन्याचांदीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीमध्ये तेजी आल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवर झाला आहे. असे असले तरीही कोरोना व्हॅक्सिनसंदर्भातील सकारात्मक बातम्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव कायम आहे.