नवी दिल्ली, 05 मार्च: भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यातच सोन्याचे भावही (Gold Rates) कमी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडे सध्या सोनेखरदेची एक चांगली संधी आहे. सोन्याचे दर प्रति तोळा 44,400 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी (Gold Silver Price) झाले आहेत. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.3% नी कमी होत 44,400 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत 0.6% नी घसरून 65,523 रुपये प्रति किलो झाली आहे.
याआधीच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती कमी होऊन गेल्या काही महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX- Multi Comodity Exchange) सोन्याचे दर 44,589 प्रति तोळावर पोहोचले होते.
आतापर्यंत 12000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
सोन्याचे दर आता गेल्या 10 महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावरुन 12000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 56,200 या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
(हे वाचा-आजपासून स्वस्तात खरेदी करा घर, गाडी, जमीन; SBI देतंय स्वप्न पूर्ण करण्याची संधी)
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 44,400 रुपये प्रति तोळा आहे. जो गेल्या 10 महिन्यातील निच्चांक आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 368 रुपयांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर गेल्या 9 महिन्यातील निच्चांकी स्तरावर आहेत. स्पॉट गोल्ड 0.2% ने कमी होत 1,693.79 डॉलर प्रति औंस आहेत.
काय आहे आजचा चांदीचा भाव?
दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 65,523 रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 0.2% ने वाढून 25.35 डॉलर प्रति औंस झाले आहेत.