मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आजही तेजी तर चांदीलाही झळाळी; वाचा आजचे दर

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आजही तेजी तर चांदीलाही झळाळी; वाचा आजचे दर

Gold Silver Price, 15 July 2021: गुरुवारी सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी आल्याचं पाहायला मिळालं आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलरमध्ये मजबुती आल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 15 जुलै: दिल्लीतील सराफा बाजारात आज 15 जुलै रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) वधारले आहेत. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) आज उसळी पाहायला मिळाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर  47,266 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर बाजार बंद होताना 68,194 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत मात्र चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे लेटेस्ट दर (Gold Rates on 15th July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात 177 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 47443 रुपये प्रति तोळावर  पोहोचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Prices in International Market) आज वाढून  1,831 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा-या 3 बँकांनी सुरू केली खास सेवा! केवळ मोबाइल क्रमांकावरुन पाठवता येतील 1 लाख चांदीचे लेटेस्ट दर (Silver Rates on 15th July 2021) चांदीच्या किंमतीतही आज तेजी पाहायला मिळते आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात किरकोळ 83 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 68,277 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचे दर (Silver Prices in International Market) 26.30 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे का झाली सोन्याच्या किंमतीत वाढ? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमधील कमजोरीमुळे आज सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकन बाँड यील्डमध्येही घसरण झाल्याचा परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढत आहेत, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होत आहे.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

पुढील बातम्या