Gold Price: मकर संक्रातीला स्वस्त झालं सोनंचांदी, इथे तपासा काय आहेत आजचे भाव

Gold Price: मकर संक्रातीला स्वस्त झालं सोनंचांदी, इथे तपासा काय आहेत आजचे भाव

सोनं-चांदीच्या दरात (Gold Price Today) वायदे बाजारात आज घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 14 जानेवारी 2021 रोजी सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी: सोनं-चांदीच्या दरात (Gold Price Today) वायदे बाजारात आज घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 14 जानेवारी 2021 रोजी सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. वायदे बाजारात सोन्याच्या किंमती 435.00 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48,870 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याशिवाय चांदीच्या फ्यूचर ट्रेडिंगमध्ये 766 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे भाव 65,255 रुपये प्रति किलो झाले आहेत. तपासा काय आहेत महानगरांमध्ये सोन्याचे दर

याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी देखील आज घसरण झाली आहे. अमेरिकेत सोन्याच्या किंमतीत 9.43 डॉलरने घसरण झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 1,838.56 डॉलर प्रति औंस वर ट्रेड करत होते. याशिवाय चांदीमध्ये 0.15 डॉलरची घसरण झाल्यानंतर दर 25.20 डॉलर या स्तरावर आहेत.

महानगरात सोन्याच्या या दराने झाली ट्रेडिंगला सुरुवात (प्रति 10 ग्रॅम)

>> दिल्ली- 52750

>> मुंबई - 4945

(हे वाचा- COVID-19 Vaccine: सध्या बाजारात नाही मिळणार कोरोना लस, NITI आयोगाचं स्पष्टीकरण)

>> कोलकाता - 51690

>> चेन्नई - 50880

महानगरात हे आहेत चांदीचे भाव (प्रति किलो)

>> दिल्ली - 66000

>> मुंबई - 66000

>> कोलकाता - 66000

>> चेन्नई - 70300

(हे वाचा- महानगरांमध्ये इंधन दरात मुंबई पहिल्या क्रमांकावर! आजही दर 91 रुपये प्रति लीटर पेक्षा जास्त)

बुधवारी काय होती परिस्थिती?

बुधवारी एमसीएक्सवरील फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे वायदा सोनं 300 रुपयांच्या अगदी छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होतं. शेवटी जवळपास अर्ध्या टक्के म्हणजेच 234 रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर सुमारे 49280 प्रति तोळावर बंद झाले. यापूर्वी मंगळवारी भाव 260 रुपयांनी घसरून 49080 रुपयांवर बंद झाले होते. सोन्याचे दर कमी जास्त होत असले तरी उच्चतम किंमतीपेक्षा प्रति तोळा 7,000 रुपयांनी स्वस्तच आहेत. 

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 14, 2021, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading