मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Silver Price: गुढीपाडवा होऊन गेला तरीही सोन्याच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price: गुढीपाडवा होऊन गेला तरीही सोन्याच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या आजचे भाव

आजचे सोन्याचे भाव

आजचे सोन्याचे भाव

गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत वाढ दिसून येतेय. अशा परिस्थितीत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीची काय स्थिती आहे ते जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च: गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज म्हणजेच 23 मार्च 2023, गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. आज देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचा भाव 494 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह 59,283 रुपयांवर उघडलाय. तर सकाळी 11 वाजेपर्यंत थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. ती सध्या 59,211 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. बुधवारी सोने 58,756 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

चांदीचे दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या किमतीतही कालच्या तुलनेत आज वाढ दिसून येतेय. आज, चांदीमध्ये 506 रुपयांची म्हणजेच 0.73 टक्क्यांची वाढ झाल्याची पाहायला मिळाले. ती 69,822 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडली गेली. यानंतर चांदीच्या दरात आणखी काही वाढ नोंदवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत तो 69,850 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल म्हणजेच बुधवारी चांदीचा भाव 69,309 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्या-चांदीची काय स्थिती आहे?

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा दर तेजीत आहे. चांदीच्या दरात घट नोंदवली जात आहे. सोने प्रति औंस 1,976 डॉलरवर व्यवहार करत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत 0.25 टक्क्यांनी घट झाली असून ती प्रति औंस 22.9 डॉलरवर व्यवहार करत आहे.

Gold Rate Today : श्रीमंत करणार सोनं! जुलैपर्यंत होऊ शकतं इतकं महाग, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

देशातील 4 प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या किंमती किती?

दिल्ली - 22 कॅरेट सोने 54,350 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई- 22 कॅरेट सोने 54,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

कोलकाता- 22 कॅरेट सोने 54,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई- 22 कॅरेट सोने 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदीच्या किंमती किती?

दिल्ली - चांदी 71,600 रुपये प्रति किलो

मुंबई- चांदी 71,600 रुपये प्रति किलो

कोलकाता-चांदी 71,600 रुपये प्रति किलो

चेन्नई- चांदी 74,000 रुपये प्रति किलो

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today