मुंबई, 2 फेब्रुवारी : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळत आहे. सोनं आता पुन्हा एकदा नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. सोन्याचा भाव 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला असताना, चांदीचा भावही 71,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे.
गुरुवारी सकाळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलीये. यापूर्वी सोन्याचा व्यवहाराची सुरुवात 58,825 वर उगडून सुरू झाली होती. परंतु काही काळानंतर भावात काहीशी घसरण दिसून येऊ लागली. मात्र, मागील बंद किमतीच्या तुलनेत सोने अजूनही 1.29 टक्क्यांच्या वाढीने व्यवहार करत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नागपुरात सोनं इतर जिल्ह्यांपेक्षा स्वस्त आहे.
IRCTC Tour: इंडियन रेल्वेचे हे टूर पॅकेज पाहिले का? स्वस्तात फिरुन या नॉर्थ ईस्ट
आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी चांदीचा भाव 1,499 रुपयांनी वाढून 71,340 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 70 हजारांवर उघडून सुरू झाली होती, परंतु ट्रेडिंग सुरू होताच गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू केली आणि चांदीचा भाव मागील बंद दरापेक्षा 2.15 टक्क्यांनी वाढला.
Budget 2023: ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना मोठा धक्का! बजेटमध्ये करण्यात आली 'ही' घोषणा
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,847 | 58,470 |
22 कॅरेट | 5,360 | 53,600 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | --------- | --------- |
वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,789 | 57,890 |
22 कॅरेट | 5,356 | 53,560 |
20 कॅरेट | 4,832 | 48,320 |
18 कॅरेट | 4,698 | 46,980 |
कोल्हापूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,880 | 58,800 |
22 कॅरेट | 5,410 | 54,100 |
20 कॅरेट | ------- | ------- |
18 कॅरेट | 4,586 | 45,860 |
सोलापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५८२९ | ५८२९८ |
22 कॅरेट | ५३४३ | ५३४३५ |
20 कॅरेट | ४८५७ | ४८५७९ |
18 कॅरेट | ४३७२ | ४३७२२ |
नागपूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,820 | 58,200 |
22 कॅरेट | 5,530 | 55,300 |
20 कॅरेट | 5,190 | 51,900 |
18 कॅरेट | 4,600 | 46,000 |
सांगली सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,900 | 59,000 |
22 कॅरेट | 5,711 | 54,520 |
20 कॅरेट | --- | --- |
18 कॅरेट | 4,602 | 46,20 |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today