मुंबई : लग्नसराईचे मुहूर्त आहेत त्यामुळे सोनं खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी आहे. लग्नसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी करणं स्वस्त झालं आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 408 रुपयांनी कमी होऊन 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, मागील व्यापारात सोने 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीही 594 रुपयांनी कमी होऊन 61,075 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
सोनं का झालं स्वस्त
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत वाढत्या व्याजदराची चिंता. हाय रिज फ्युचर्समधील मेटल ट्रेडिंगचे संचालक डेव्हिड मेगर यांच्या मते अजूनही सोन्यात घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतींचा परिणाम हा भारतातील सोन्यावर होत आहे.
सोन्याच्या खरेदी-विक्रीवर नवा नियम, पैसे गुंतवणाऱ्यांना मोठा फायदा
इंडियन बुलियन मार्केटच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सोन्याचे दर काय आहेत पाहुया
24 कॅरेट सोन्याचे दर - 1 ग्रॅम - 5,252, 10 ग्रॅम- 52,520
22 कॅरेट सोन्याचे दर - 1 ग्रॅम - 4,814 , 10 ग्रॅम- 48, 143
20 कॅरेट सोन्याचे दर - 1 ग्रॅम - 4377 , 10 ग्रॅम- 43,767
18 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम - 3,939 , 10 ग्रॅम- 39,390
14 कॅरेट सोन्याचे दर - 1 ग्रॅम - 3,064, 10 ग्रॅम- 30,637
अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह येत्या महिनाभरात व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करू शकते, असे आणखी एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोन्यावरचा दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,745.5 डॉलर प्रति औंस, तर चांदी 20.83 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होती.
लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन
एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार म्हणाले, 'डॉलर इंडेक्समध्ये वाढ झाल्याने आशियात कॉमेक्स गोल्डमध्ये घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या वित्तीय धोरण कडक करण्याच्या पद्धतीबद्दल बाजारातील सहभागी नवीन संकेतांची वाट पाहत आहेत."
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नायट्रिक अॅसिडचा खऱ्या सोन्यावर काहीही परिणाम होत नाही. परीक्षण करण्यासाठी दागिने थोडे खरवडून त्यावर नायट्रिक अॅसिड टाकावे. सोनं असेल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. व्हिनेगर जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.