मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold-Silver Price Today: चांदीमध्ये मोठी घसरण, सोनंही उतरलं; 11000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold-Silver Price Today: चांदीमध्ये मोठी घसरण, सोनंही उतरलं; 11000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Silver Price, 28 September 2021: सोन्याच्या किंमतीत मंगळवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दर आज कोसळले आहेत.

Gold Silver Price, 28 September 2021: सोन्याच्या किंमतीत मंगळवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दर आज कोसळले आहेत.

Gold Silver Price, 28 September 2021: सोन्याच्या किंमतीत मंगळवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दर आज कोसळले आहेत.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today 28 September 2021) 28 सप्टेंबर 2021 रोजी कमी झाले आहेत. यामुळे सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 11 हजार रुपयांनी कमी आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today)  आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today) 45,134 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर (Silver Rates Today) 59,534 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. मात्र चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही.

सोन्याचे नवे दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 54 रुपये प्रति रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,080 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. यानंतर सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा जवळपास 11,120 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्या तुलनेत सोन्याचे दर 11,120 रुपयांनी स्वस्त आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी होऊन 1,743 डॉलर प्रति औंस या स्तरावर आहेत.

RBIने ठोठावला या महत्त्वाच्या बँकेवर 2 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

चांदीचे नवे दर

चांदीच्या किंमतीत देखील आज जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरात 573 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर 58,961 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 22.37 डॉलर प्रति औंस आहेत.

LPG Cylinder Subsidy: पुन्हा मिळू शकेल LPG वर सब्सिडी, सरकारचा मास्टर प्लॅन

का कमी झाले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, अमेरिकी बाँडच्या यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या दरावर दबाव आहे. यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दुसरीकडे, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, डॉलरच्या मजबुतीमुळे आणि अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today