मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price मध्ये घसरण सुरूच; सणासुदीला बायकोला खूश करण्याचा गोल्डन चान्स

Gold Price मध्ये घसरण सुरूच; सणासुदीला बायकोला खूश करण्याचा गोल्डन चान्स

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

Gold Silver Price Today : सोन्याचे आजचे दर काय आहेत पाहा.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : सणासुदीचा कालावधी आहे. सणवार म्हटलं की महिलांची सजण्याची तयारी सुरू होते. कपड्यांसह दागिनेही (Gold rate today) आलेच. तुम्हीसुद्धा तुमच्या आईला, बायकोला, बहिणीला सोन्याचे दागिने (Gold Price Today) देणार असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोने दरात सातत्याने घसरण होताना दिसते आहे.

सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोनं 46 हजार 272 रुपये प्रति 10 ग्रॅम (Price of 10 Gram Gold now) झालं आहे. त्याचबरोबर चांदी 62,639 रुपये प्रति किलो आहे.

हे वाचा - आनंदाची बातमी! आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकांच्या ठेवीदारांना मिळणार 5 लाख रुपये

सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 46,372 रुपये प्रति 10 ग्रॅम होती तर चांदी 62,773 रुपये प्रति किग्रॅ होती.सोने दरात आज 100 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी 134 रुपयांनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,815 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीच्या भावात काही विशेष बदल झाले नाहीत हे भाव 24.16  डॉलर प्रति औंस आहेत.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Money