Gold-Silver Price Today 9th june: सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, असे आहेत 18 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold-Silver Price Today 9th june: सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, असे आहेत 18 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 जून : कोरोनाच्या संकटात (Coronavirus) आजपासून लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजेच अनलॉक 1.0ला सोमवारपासून सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशीही अनलॉक 1.0मध्ये सोन्या-चांदीच्या भावात बदल झाले. आज देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे ताजे दर 46 हजार 483 रुपये प्रति तोळा आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात सोमवारपेक्षा 4 रुपयांनी वाढ झाली. तर, 23 कॅरेट सोन्यातही 4 रुपयांनी, 22 आणि 18 कॅरेट 3 रुपयांनी वाढलं आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत.

23 कॅरेट सोनं म्हणजे गोल्ड 995च्या किंमत 46 हजार 483 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 3 रुपयांनी वाढून 42 हजार 578 रुपये प्रति 10 ग्राम झाली आहे. या किंमती जीएसटी शिवाय आहे. तर, 18 कॅरेट सोन्याची किंमत 34 हजार 862 रुपये झाली आहे.

वाचा-जिओ प्लॅटफॉर्ममध्ये अबु धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी करणार 5,684 कोटींची गुंतवणूक

तर, आज सकाळी वायदा बाजारात चांदीच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. एमसीएक्सवर तीन जुलै 2020च्या चांदीची किंतम 0.26 टक्के म्हणजे 125 रुपयांनी घसरून 48 हजार 060 रुपये प्रति किलो झाली आहे.

मंगळवारी सकाळी जागतिक बाजारपेठेतही सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदे बाजारात दर 0.30 टक्क्यांनी किंवा 5.10 डॉलर्स प्रति औंसच्या खाली घसरले. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत 0.18 टक्क्यांनी किंवा $ 3.14 डॉलरने घसरत 1,695.39 डॉलर प्रति औंस झाली.

वाचा-अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

वाचा-लॉकडाऊनमध्ये ही कंपनी झाली मालामाल, दुपटीने वाढलं उत्पन्न आणि शेअरचे भाव तर...

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 9, 2020, 1:42 PM IST

ताज्या बातम्या