Gold-Silver Price Today 5th june: सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीची झळाळी उतरली, येथे पाहा 18 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold-Silver Price Today 5th june: सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीची झळाळी उतरली, येथे पाहा 18 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

अनलॉक 1.0 मुळं आता जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र सोन्या-चांदीच्या दरात घटच झालेली पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून : देशात पाचव्या टप्प्याती लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सरकारच्या वतीनं अनलॉक 1.0 (Unlock 1.0) मुळं आता जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र सोन्या-चांदीच्या दरात घटच झालेली पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 700 रुपये आहेत. तर चांदीही 255 रुपये प्रति किलो ग्रॅम स्वस्त झालं आहे.

याआधी एक जून रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 043 होते. तर 2 जून रोजी दर 47 हजार 075 होते. तीन रोजी दर उतरून 46 हजार 875 झाले. तर 4 जून रोजी सोन्याचे दर 46 हजार 767 होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत.

वाचा-लॉकडाऊनमध्ये ही कंपनी झाली मालामाल, दुपटीने वाढलं उत्पन्न आणि शेअरचे भाव तर...

18 ते 24 कॅरेट सोन्याच्या किमती

आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 67 रुपयांनी घट झाली. यासह प्रति किलो सोन्याचे दर आता 46 हजार 700 झाले आहेत. तर चांदीचे दर 47 हजार 675 रुपये आहेत. याच बरोबर 23 कॅरेट म्हणजे गोल्ड 995मध्ये 67 रुपयांनी घट झाली आहे. यासह सोन्याचे दर 46 हजार 513 रुपये आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 62 रुपयांनी घटले. 22 कॅरेट सोन्याचे दर 42 हजार 777 रुपये आहे. तर, 18 कॅरेट सोन्याची किंमत 35 हजार 025 रुपये आहे.

वाचा-उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

भविष्यात काय राहणार सोन्याच्या किंमती?

जगभरात झालेल्या अनेक रिसर्च अहवालांच्या मते सोन्यामध्ये पुढील काही महिन्यामध्ये गुंतवणूक कायम राहील. पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 54000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

वाचा-नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

First published: June 5, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या