Home /News /money /

Gold-Silver Price Today: सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त! पाहा आजचे दर

Gold-Silver Price Today: सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त! पाहा आजचे दर

Gold Silver Price Latest Updates: आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोनं 52140 रुपये, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 57838 रुपये झाले आहे.

    मुंबई 05 ऑगस्ट : भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहेत. आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोनं 52140 रुपये, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 57838 रुपये झाले आहे. सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. ibjarates.com नुसार, 995 शुद्धतेचं 10 ग्रॅम सोने आज 51931 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 916 शुद्धतेचं सोनं 47760 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा दर आज 39105 रुपये झाला आहे. त्याच वेळी, 585 शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 30502 रुपयांवर गेला आहे. 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 57838 रुपयांना विकली जात आहे. सोन्या-चांदीच्या दरात झाला हा बदल- सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असतात. आज 999 शुद्धतेचं सोनं 101 रुपयांनी महागले आहे. 995 शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने आज 92 रुपयांनी महागले आहे. त्याचवेळी 750 शुद्ध सोन्याच्या दरात आज 76 रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय 585 शुद्धतेचे सोने आज 59 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर आज एक किलो चांदी 219 रुपयांनी स्वस्त झाली आहे. हेही वाचा-  e-Shram Card Alert: ‘या’ यादीत तुमचं नाव असेल, तर हप्त्याचे पैसे अडकलेच म्हणून समजा, पाहा संपूर्ण यादी कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या