Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, एका तोळ्यासाठी आता किती पैसे मोजावे लागतील?

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, एका तोळ्यासाठी आता किती पैसे मोजावे लागतील?

    मुंबई, 31 मे : सोन्याच्या दरात (Gold-Silver Price today) गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष सोन्याच्या दरांकडे असतं. ग्लोबल मार्केटच्या (Global Market) दबावामुळे मंगळवारी सकाळी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे, मात्र अजूनही सोने त्याच्या उच्च दरापेक्षा सुमारे 6,000 रुपयांनी स्वस्त आहे. चांदीच्या दरातही आज घसरण दिसून आली आणि भाव 62 हजारांवर आले. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 14 रुपयांनी घसरून 56,901 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्याचे व्यवहार जवळपास या पातळीवर सुरू झाले होते आणि काही वेळातच गुंतवणूकदारांच्या विक्रीनंतर, फ्युचर्सच्या किमती मागील सत्राच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी खाली आल्या. सोन्याचा भाव उच्चांक पातळीपेक्षा 6 हजार रुपयांनी स्वस्त आहे. मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला होता. Business Idea : भारतीय रेल्वेसोबत काम करा आणि कमवा भरपूर पैसे, संधी गमावू नका चांदीच्या दरामध्येही घसरण सोन्या सोबतच आज चांदीचा वायदा व्यवहारही कमजोर दिसत आहे. MCXवर आज सकाळी चांदीचा भाव (Silver Price Today) 320 रुपयांनी घसरून 61,562 रुपये प्रति किलोवर आला. तत्पूर्वी चांदीची किंमत 61,597 रुपयांवर उघडली गेली आणि मागणी कमी झाल्यानंतर, मागील किमतीच्या तुलनेत 0.52 टक्क्यांनी कमी होऊन व्यवहार सुरू झाला. चांदीचा सध्याचा दरही त्याच्या उच्चांकापेक्षा 12 हजार रुपयांनी कमी आहे. मार्चच्या सुरुवातीला चांदीचा वायदा भाव 73 हजारांच्या वर होता. जागतिक बाजारातही आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. सोन्याच्या किमतीत रुपयाने किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सकाळी, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,852.63 डॉलर प्रति औंस होती, जी मागील दरापेक्षा 0.01 टक्के जास्त आहे. आज सकाळी चांदीचा स्पॉट रेट 0.32 टक्क्यांनी घसरून 21.86 डॉलर प्रति औंस झाला. होम लोन फेडण्यासाठी 'हा' पर्याय निवडा, लाखो रुपयांची बचत सहज शक्य होईल दर घसरण्याचे कारण काय? आज सलग दुसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात कमजोरी दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची घसरण. त्याचवेळी अमेरिकेत बॉन्ड यील्डही कमी होत असून, त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा वापर आणि किंमत कमी झाल्याचा फायदाही भारतीय बाजाराला होणार आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असूनही सोन्याच्या दरात घट झाल्याने अनेकांचा फायदा होत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या