सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदी वधारली; असे आहेत आजचे दर

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदी वधारली; असे आहेत आजचे दर

आज सोन्या-चांदीच्या किंमतीत काहीसा बदल झालेला पाहायला मिळाला. सोन्याच्या किंमतीत आज घसरण झाली तर चांदीचे भाव वाढले.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यावेळी सराफा मार्केट बंद असले तरी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार रोज पाहायला मिळत आहे. आज सोन्या-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळाला (Gold-Silver Price Today 26th May 2020). शुक्रवारी मार्केट बंद होण्याआधी असलेल्या सोन्याच्या भावापेक्ष आज 10 रुपये प्रति ग्रॅम सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या किंमतीत मात्र वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 90 आहे. तर याआधी शुक्रवारी सोन्याचे भाव 47 हजार 100 होते.

एकीकडे सोन्याचे भाव कमी झाले असताना चांदी मात्र वधारली आहे. 940 रुपये प्रति किलोसह चांदीचा आजचा दर 47 हजार 985 आहे. तर, 23 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्या-चांदीच्या अपडेटेड किंमती पाहता येतील.

वाचा-विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम

एमसीएक्स एक्चचेंजवर (MCX) सोन्याच्या किंमतीत 137 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सोन्याचे भाव 47 हजार 110 आहेत. तर चांदीचे भाव 629 रुपयांनी वाढून 48 हजार 886 रुपये प्रति किलो झाले आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916 किंवा 875 असे अंक लिहीलेले असतात. याच अंकांवरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर सोनं 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

वाचा-ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास एक SMS करेल तुमचं बँक खातं रिकामं

सोन्याच्या किमतीत किती होणार वाढ?

तज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या जाळ्यात अडकली आहे. त्यातच अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा वाढत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती येत्या काळात वाढू शकतात. सोनं लवकरच 50 हजारांवर जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार देशात सुमारे 22-25 हजार टन सोनं घरात पडून आहे, जे सध्या वापरात नाही. ग्रामीण भागात यातील 65 टक्के भाग आहे.

वाचा-RBI नंतर SBI देखील ग्राहकांना खूशखबर देण्याची शक्यता, लवकरच होऊ शकेल EMI कमी

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: May 26, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading