Home /News /money /

Gold-Silver Price Today 11th june: सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, असे आहेत आजचे दर

Gold-Silver Price Today 11th june: सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, असे आहेत आजचे दर

बुधवारी तब्बल 8 दिवसांनी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. दरम्यान आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

    नवी दिल्ली, 11 जून : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज पुन्हा एकदा बदल झालेला पाहायला मिळाला. याआधी बुधवारी तब्बल 8 दिवसांनी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. दरम्यान आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज देशभरातील सराफा बाजारांमध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा 425 रुपयांनी वाढली. यासह 10 ग्रॅमचे दर 47 हजार 430 वर पोहचले आहे. त्यातबरोबर आज 23 कॅरेट ते 18 कॅरेट पर्यंतच्या सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 425 रुपयांनी वाढ झाली तर 23 कॅरेट सोन्याच्या किंमती 423 रुपयांनी वाढल्या. यासह 23 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 240 झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या किंमत 43 हजार 446 झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 35 हजार 573 आहेत. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 575 प्रति किलो ग्रॅम वाढ झाली आहे. यासह चांदीचा आजचा दर 48 हजार 395 आहे. वाचा-देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना रिलिफ फंडातून मिळणार 7500 रुपये? तर, एमसीएक्सवर भविष्यातील सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 550 रुपयांनी 10 ग्रॅमच्या किंमतीत वाढ होऊन 47 हजार 157 दर झाला आहे. तर, चांदीच्या दरात 950 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह चांदीचे दर 49 हजार 014 रुपये झाले आहेत. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात उच्चांक पाहायला मिळाला होता. सोन्याचे दर 48 हजारांपर्यंत पोहचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत. वाचा-सोनं खरेदी करण्यासाठी जातायं? हे महत्त्वाचे नियम पाळायला विसरू नका भविष्यात सोन्याच्या किंमती वाढणार कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगासमोर आर्थिक मंदीचे सावट आहे. जगभरातील अनेक केंद्रीय बँका व्याजदरामध्ये कपात करून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अत्यंत जोखमीची ठरू शकते. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक असणाऱ्या सोन्याकडे अधिक प्रमाणात वळले आहेत. त्यांच्यासाठी गोल्ड इटीएफ, सॉव्हरेन गोल्ड यांसारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. वाचा-अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या