मुंबई, 10 जून : कोरोनाच्या संकटात (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजेच अनलॉक 1.0ला सुरुवात झाली. आज सलग दुसऱ्या दिवशीही अनलॉक1.0मध्ये सोन्या-चांदीच्या भावात बदल झाले. आज देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 515 रुपयांनी वाढ झाली. तब्बल 8 दिवसांनी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, याआधी 2 जून रोजी सोन्याचे दर वाढले होते. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव आता 46 हजार 994 झाले आहेत.
तर, 23 कॅरेट सोन्याचे दर 513 रुपयांनी वाढले. सराफा बाजारात आज 24 कॅरेटपासून 18 कॅरेटपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. तर, चांदीच्या दरातही 35 रुपयांनी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत.
वाचा-सोनं खरेदी करण्यासाठी जातायं? हे महत्त्वाचे नियम पाळायला विसरू नका
23 कॅरेट सोनं म्हणजे गोल्ड 995च्या किंमत 513 रुपयांनी वाढून 46 हजार 806 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 427 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह दर 43 हजार 047 झाले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याची किंमत 387 रुपयांनी वाढून 35 हजार 246 झाली आहे.तर, ऑगस्टच्या एमसीएक्सनुसार (MCX) भविष्यातील सोन्याच्या किंमतीत 0.07% टक्क्यांनी वाढ होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजार 628 झाली आहे. तर, चांदीच्या दरात 0.24% वाढ होऊन प्रति किलोमागे किंमत 48 हजार 215 झाली आहे.
वाचा-अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.
2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.
वाचा-उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही
संपादन, संकलन-प्रियांका गावडे