नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : युरोपियन सेंट्रल बँक (ECB-European Central bank) आज संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. व्याजदरासह मदत पॅकेजबाबतही यात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या पॅकेजच्या अपेक्षेमुळे युरोची किंमत वाढत असून अमेरिकन डॉलर घसरला आहे. परिणामी सोन्याचे दरही घसरले आहेत. कोमॅक्सवर सोन्याचे भाव प्रति औंस 1900 डॉलरवर येऊ शकतात. म्हणूनच भारतीय बाजारातही सोन्याची किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय बाजारपेठेत आज सोनं स्वस्त का होणार?
एक्सपर्टनुसार देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची मागणी आणखी कमी झाली आहे. तसेच, दोन दिवसानंतर भारतीय रुपया मजबूत झाला आहे. अशा परिस्थितीत ही दोन्ही चिन्हे सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दर्शवित आहेत.
वाचा-PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाखांचा फायदा
आधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 51153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते आणि तर सोन्यात घसरण होत 51165 रुपये प्रति तोळाने किंमत सुरू झाली होती. तर, आधीच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपयांवर बंद झाली होती.
वाचा-मुलीचे भविष्य करा सुरक्षित! या योजनेत 21 वर्षात मिळेल 64 लाखांचा रिटर्न
वायदा बाजारात सोन्याच्या किंमतींवर दबाव कायम
एमसीएक्सवर गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचे वायदे 0.07% वाढून 51,440 प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 0.41% वाढून, 68,725 प्रति किलो झाली. भारतातील सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. मागील महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅम जवळपास 5 हजार रुपयांनी घसरले. त्याचप्रमाणे चांदीचे दर 10,000 डॉलर प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.