Home /News /money /

Gold Silver Price: सोनं आठवडाभरात स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण; चेक करा नवे दर

Gold Silver Price: सोनं आठवडाभरात स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण; चेक करा नवे दर

आठवड्याच्या सुरुवातीला (9 मे ते 13 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,479 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,465 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 61,361 रुपयांवरून 59,106 रुपये प्रति किलोवर आली आहे.

    मुंबई, 14 मे : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Prices) साप्ताहिक घसरण झाली आहे. या व्यापारी आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1,014 रुपयांची घट नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या दरात 2,255 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (9 मे ते 13 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,479 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,465 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 61,361 रुपयांवरून 59,106 रुपये प्रति किलोवर आली आहे. IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. CIBIL स्कोरबद्दल 'या' महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आहे का? कर्ज घेताना होतो फायदा गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले? >> 09 मे 2022- रुपये 51,479 प्रति 10 ग्रॅम >> 10 मे 2022- रुपये 51,496 प्रति 10 ग्रॅम >> 11 मे 2022- रुपये 51,205 प्रति 10 ग्रॅम >> 12 मे 2022- रुपये 51,118 प्रति 10 ग्रॅम >> 13 मे 2022- 50,465 रुपये प्रति 10 ग्रॅम गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला? >> 09 मे 2022- रुपये 61,361 प्रति किलो >> 10 मे 2022- रुपये 61,473 प्रति किलो >> 11 मे 2022- रुपये 61,450 प्रति किलो >> 12 मे 2022- रुपये 59,796 प्रति किलो >> 13 मे 2022- रुपये 59,106 प्रति किलो रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते फायद्याची, कशी आणि कोणते घटक ठरतील महत्वाचे, चेक करा आर्थिक वर्ष 22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात 55 टक्क्यांनी वाढली 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून 39.15 अब्ज डॉलर झाली आहे. 2020-21 मध्ये रत्ने आणि दागिन्यांची एकूण निर्यात 25.40 अब्ज डॉलर होती, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने म्हटले आहे. FY22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढली गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर होती.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या