Home /News /money /

Gold Price Today: सोनं आज पुन्हा महागलं; एक तोळ्यासाठी किती पैसे जास्त मोजावे लागणार?

Gold Price Today: सोनं आज पुन्हा महागलं; एक तोळ्यासाठी किती पैसे जास्त मोजावे लागणार?

सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. MCXवर चांदीचा भाव 393 रुपयांनी वाढून 61,890 रुपये प्रति किलो झाला. एक दिवसापूर्वी सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 63 हजारांच्या आसपास होता.

    मुंबई, 10 मे : मागील आठवड्यापर्यंत सोन्याची झालेली घसरण आता असून सोन्याच्या दरात आज वाढ होत आहे. आजही सोन्याचे दर वधारले आहेत. जागतिक बाजारात सततच्या वाढीमुळे सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी उसळी दिसून आली. मात्र, सोन्याचा भाव अजूनही 51 हजारांच्या खालीच आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Price Today) सकाळी 11 रुपयांनी वाढून 50,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 50,971 रुपये प्रति 10 ग्रॅमने व्यवसाय सुरू झाला, परंतु गुंतवणूकदारांची मागणी आणि लग्नाचा हंगाम यामुळे त्यात घट दिसून आली नाही आणि काही काळानंतर त्याचे भाव 0.02 टक्क्यांनी वाढले. चांदीची चमकही वाढली सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ (Silver Price Today) झाली आहे. MCXवर चांदीचा भाव 393 रुपयांनी वाढून 61,890 रुपये प्रति किलो झाला. एक दिवसापूर्वी सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 63 हजारांच्या आसपास होता. आजही व्यवहाराच्या सुरुवातीला चांदीची किंमत 61,793 रुपये प्रति किलोवर उघडली आणि लवकरच 0.64 टक्क्यांनी वाढली. LIC IPO चे वाटप कधी होणार? गुंतवणूकदारांना किती नफा होऊ शकतो? चेक करा डिटेल्स जागतिक बाजारात किंमत काय? अमेरिका, युरोपसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.42 टक्क्यांनी वाढून $1,862.66 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीत 1.05 टक्क्यांनी मोठी उसळी आली आणि त्याची विक्री $22.05 प्रति औंस झाली. Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार सोन्या-चांदीच्या दरात वाढीचं कारण काय? यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंटने वाढ केल्यानंतर गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. फेड रिझर्व्हने व्याजदर आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच महागाईचा दरही सातत्याने वाढत आहे, ज्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत असून जगभरातील इक्विटी मार्केटमध्ये सुधारणा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आपला पैसा बाजारातून बाहेर काढून सोन्यासारख्या स्थिर आणि टिकाऊ गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवत आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने त्याची मागणीही वाढत असून दरही वाढू लागले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Investment, Money

    पुढील बातम्या