मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ, मुंबई-दिल्लीचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ, मुंबई-दिल्लीचे आजचे दर जाणून घ्या

१ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट शुद्धतेच्या १ तोळे सोन्यासाठी ग्राहकांना ५१ हजार ३८० रुपये मोजावे लागत होते.

१ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट शुद्धतेच्या १ तोळे सोन्यासाठी ग्राहकांना ५१ हजार ३८० रुपये मोजावे लागत होते.

१ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट शुद्धतेच्या १ तोळे सोन्यासाठी ग्राहकांना ५१ हजार ३८० रुपये मोजावे लागत होते.

    मुंबई : तीन दिवसांनंतर आज बाजारपेठेत सोन्या-चांदीला झळाळी आल्याचं पाहायला मिळालं. नवरात्रीआधी पुन्हा सोन्याचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तीन दिवसांनंतर आज सोन्याचे दर वाढले आहेत. सोनं ४४२ रुपयांनी महाग झालं आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. महत्त्वाच्या शहरांमधील सोन्या चांदीचे दर जाणून घेऊया. सोन्याचे दर ४४२ रुपयांनी वाढलं आहे. १ तोळे सोन्यासाठी ५० हजार ३९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीसाठी ग्राहकांना ५८ हजार २२ रुपये मोजावे लागणार आहेत. एक किलो चांदीसाठी ग्राहकांना ५८, ५८० रुपये मोजाले लागणार आहे. १ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट शुद्धतेच्या १ तोळे सोन्यासाठी ग्राहकांना ५१ हजार ३८० रुपये मोजावे लागत होते. ३१ ऑगस्टला हेच दर घसरून ५१ हजार २७० वर पोहोचले. तर आज १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना ५० हजार २०० रुपये मोजावले लागणार आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमसाठी ५ हजार २०, आठ ग्रॅमसाठी ४० हजार तर १० ग्रॅमसाठी ५० हजार २०० रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये ५१ हजार रुपये रुपये दर आहेत. मुंबईत ५० हजार २०० रुपये दर आहेत. दिल्लीतील ग्राहकांना ५० हजार ३५० रुपये मोजावे लागणार आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर- एक ग्रॅमसाठी ४ हजार ६००, आठ ग्रॅमसाठी ३६ हजार ८०० तर १० ग्रॅमसाठी ४६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याची खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणं खूप महत्त्वाचं आहे. 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. यामुळे सोन्याची शुद्धता कळते आणि फसवणूक होण्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold price

    पुढील बातम्या