Home /News /money /

उच्चांकी पातळीवरुन 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय असेल भाव

उच्चांकी पातळीवरुन 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय असेल भाव

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 30 सप्टेंबरपासून प्रति 10 ग्रॅम 5684 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरातही जवळपास 16,034 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : भारतीय बाजारात सोने-चांदीच्या Gold-Silver Price Today दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा दर 0.9 टक्क्यांच्या घसरणीसह 50,130 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पाहायला मिळाला. तर चांदीच्या दरात 0.88 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,605 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला होता. या दरम्यान चांदीचा भावही जवळपास 80000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. काय आहे जागतिक बाजारातील स्थिती - जागतिक बाजारात अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या तब्येतीकडे गुंतवणूकदारांची नजर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांवर, डॉलरचा मजबूतीचा परिणाम पाहायला मिळाला. परंतु सोमवारी डॉलरच्या कमजोरीमुळे गुंतवणूकदारांना सोनं खरेदीसाठी मदत मिळाली. कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. परंतु आता यात काहीशी स्थिरता आल्याचं चित्र आहे. आर्थिक व्यवहार सुरु होण्यासह आता बाजारात रिकव्हरीही पाहायला मिळतेय. कमोडिटी मार्केटमध्येही Commodity Market चांगली स्थिती असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 30 सप्टेंबरपासून प्रति 10 ग्रॅम 5684 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरातही जवळपास 16,034 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे. हे वाचा - Amazon लवकरच आणणार ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल; 1 लाखहून अधिक दुकानदारांना कामाची संधी दिवाळीपर्यंत किती असतील सोन्याचे दर? जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरातील घसरणीचा अर्थ असा नाही की, सोन्याचे दर आधीच्या स्तरावर येतील. सध्या सोन्याचा भाव 50000 रुपये आणि चांदी 60000 रुपयांच्या दरम्यान आहे. येणाऱ्या काळात दोन्हीमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात कोणतीही मोठी वाढ किंवा घसरण होण्याची चिन्ह नाहीत. दिवाळीमध्ये सोन्याचा भाव 50 ते 52 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वाचा - आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं प्रमुख कारण म्हणजे, गेल्या दोन महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. सध्या रुपया 73 ते 74 च्या रेंजमध्ये आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या दिवसांत तो 78 पर्यंत पोहचला होता. रुपयातील मजबूतीमुळे सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. परंतु डॉलर पुन्हा मजबूत झाल्यास, सोन्याचे दर आणखी वेगाने वाढू शकतात.
    Published by:Karishma
    First published:

    पुढील बातम्या