Home /News /money /

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदी दरात मोठी घसरण, तपासा आजचा 10 ग्रॅमचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदी दरात मोठी घसरण, तपासा आजचा 10 ग्रॅमचा लेटेस्ट भाव

सोने-चांदी दरात (Gold - Silver Price) आज सोमवारी घसरणीची नोंद झाली आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध संपल्यास सोन्याच्या मागणीत कमी येईल आणि किमती कमी होऊ शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे.

    नवी दिल्ली, 4 एप्रिल : सोने-चांदी दरात (Gold - Silver Price) आज सोमवारी घसरणीची नोंद झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 116 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीसह सोनं आज 51228.00 रुपयांवर ट्रेड (Gold Price Today) करत आहे. सोन्यासह चांदीचा भावही उतरला आहे. आज चांदीचा भाव 173 रुपयांनी कमी (Silver Price Today) झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 52650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ओपन झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 48263 रुपये आहे. 18 कॅरेट सोनं 39488 रुपये आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - पैशांची गरज लागल्यास विमा कंपनीकडून घेऊ शकता आर्थिक मदत, पाहा काय आहे नियम

    दरम्यान, रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध संपल्यास सोन्याच्या मागणीत कमी येईल आणि किमती कमी होऊ शकतात. भारतीय बाजारात चांदी 66,550 रुपये ट्रेड करेल असा अंदाज आहे. तर सोनं 50,550 रुपये स्वस्त होऊ शकतं असा अंदाज एक्सपर्ट्सने वर्तवता आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकायचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या