मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold-Silver Price: गुडन्यूज! सोनं झालं स्वस्त, खरेदीला जाण्यापूर्वी पाहा आजचे दर

Gold-Silver Price: गुडन्यूज! सोनं झालं स्वस्त, खरेदीला जाण्यापूर्वी पाहा आजचे दर

Gold-Silver Price: गुडन्यूज! सोनं झालं स्वस्त, खरेदीला जाण्यापूर्वी पाहा आजचे दर

Gold-Silver Price: गुडन्यूज! सोनं झालं स्वस्त, खरेदीला जाण्यापूर्वी पाहा आजचे दर

Gold-Silver Price Updates: 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव सध्या 52500 च्या खाली आला आहे. तर एक किलो चांदीचा भाव 58 हजार रुपयांच्या खाली आला आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट: सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Updates) नियमित चढउतार होत असतात. अनेकजण सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत असतात. जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करू पाहत असाल, तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या व्यवहारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी अजूनही प्रतितोळा भाव 52 हजार रुपयांच्या वरच आहेत. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली असून, भाव 58 हजार रुपये प्रतिकिलोच्या खाली राहिले आहेत. रुपयाच्या वाढीमुळे सोन्या-चांदीत नरमाई दिसून येत आहे. मात्र गुरुवारी विदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात किती रुपयांची घसरण? - गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 110 रुपयांनी घसरून 52250 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव 200 रुपयांनी घसरून 57,600 रुपये किलो झाला. तर 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून, भाव 47900 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. मात्र, दुसरीकडे विदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल रिझर्वच्या बैठकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातून फेडरल रिझर्व्ह आगामी काळात वाढीव दरांबाबत आक्रमक राहणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे डॉलर नरमला असून मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी केली. देशातील प्रमुख शहरांतील सोने-चांदीचे दर: मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोने 52,250 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्लीत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 48050 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचे झाले तर मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे एक किलो चांदीचा भाव 57,600 रुपयांवर आहे. हेही वाचा: डिजिटल गोल्डचा आहे जमाना! या अ‍ॅपवर मिळत आहे बंपर कॅशबॅक, आजच खरेदी करा! कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price

    पुढील बातम्या