मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, आज दागिने खरेदी केल्यास किती रुपये वाचतील?

Gold Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, आज दागिने खरेदी केल्यास किती रुपये वाचतील?

Gold Price Today: सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,976 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 ऑगस्ट : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी घसरण झाली. काल सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. तर आज त्याचे दर कमी झाले आहेत. 24 कॅरेट सोनं आज 52,224 रुपये तोळे विकलं जात आहे. तर एक किलो चांदी 58436 रुपये झाले आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 52224 रुपये आहे. तर काल व्यवहाराच्या सोन्याचा भाव 52348 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 124 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 3900 रुपयांनी स्वस्त मात्र आजही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,976 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. रेपो दरवाढीचा अनेकांना फायदा; 'या' दोन बँकांनी आपल्या FD व्याजदरात केली वाढ चांदीच्या दरातही घसरण आज चांदीचा दर 58436 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58444 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर किलोमागे आठ रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Investment, Money

    पुढील बातम्या