Home /News /money /

Gold Price Today: सोनं खरेदीची चांगली संधी, सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, चांदीही स्वस्त

Gold Price Today: सोनं खरेदीची चांगली संधी, सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, चांदीही स्वस्त

सोनं आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी किमतीपेक्षा 4,619 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने ऑलटाईम हाय गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 6 जुलै : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold-Silver Price Drop Today) झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यासाठी आज चांगली संधी आहे. सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरी उच्चांकी किमतीत पेक्षा सोनं आजही स्वस्तच आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold rate) प्रति दहा ग्रॅम 51,581 रुपये आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 52304 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 723 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. मात्र असं असलं तरी सोनं आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी किमतीपेक्षा 4,619 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने ऑलटाईम हाय गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. बँक ऑफ बडोदाचे चेकसंबंधी नवीन नियम तपासा, अन्यथा चेक क्लिअर होणार नाही चांदीचा दर चांदीचा दर (Silver Price) आज 56,081 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58153 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर किलोमागे 2072 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. प्रवाशांच्या रेल्वेत विसरलेल्या सामनाचा पुढे काय होतं? तुमचं हरवलेलं सामान परत कसं मिळवायचं? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर तेजीत आहे. यूएसमध्ये सोने 1.98 डॉलरच्या वाढीसह 1,766.89 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदी 0.15 डॉलरच्या घसरणीसह 19.04 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? सोन्याची शुद्धता ओळण्याची एक पद्धत असते. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक प्रकारचे मार्क्स आढळतात. या चिन्हांवरून दागिन्यांची शुद्धता ओळखता येते. त्याचे स्केल एक कॅरेट ते 24 कॅरेट पर्यंत आहे. 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. दागिन्यांवर हॉलमार्क लावणे बंधनकारक आहे. 24 कॅरेट सोने हे शुद्ध सोने आहे. त्यावर 999 गुण नोंदवले जातात. मात्र, 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नाहीत. जर 22 कॅरेटचे दागिने असतील तर त्यात 916 लिहिलेले असेल. 21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिले जाईल. 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे. जर 14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यात 585 लिहिलेले असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या