Home /News /money /

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात आठवड्यात घसरण, किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात आठवड्यात घसरण, किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?

सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून 5371 रुपयांनी खाली आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 26 जून : सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण (Gold-Silver Price Drop) झाली आहे. मात्र या आठवड्यात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात (Silver Price) अधिक घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात या आठवड्यात चांदी 1,700 रुपयांहून अधिक घसरली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 20 जून रोजी चांदीचे दर 61,067 रुपयांवर होते, जो आता 25 जून रोजी 59,350 रुपये प्रति किलोवर आले आहे. म्हणजेच या आठवड्यात चांदीची किंमत 1,717 रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सोन्याची किंमत (Gold Price) 233 रुपयांनी कमी झाली आहे. 20 जून रोजी सोन्याचा भाव 51,064 रुपये होता, तो आता 50,829 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार? कॅरेटनुसार सोन्याची किंमत >> 24 कॅरेट- 50,829 रुपये/तोळे >> 23 कॅरेट - 50,625 रुपये/तोळे >> 22 कॅरेट - 46,559 रुपये/तोळे >> 18 कॅरेट- 38,122 रुपये/तोळे सोने 5300 आणि चांदी 20000 पेक्षा स्वस्त या घसरणीनंतर सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून 5371 रुपयांनी खाली आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 20,630 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79,980 रुपये प्रति किलो आहे. पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत तुमचे पैसे होतील दुप्पट; टॅक्स बचतीसह आणखी काय लाभ मिळेल? मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या