मुंबई, 30 जानेवारी : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या साप्ताहिक दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही घट झाली आहे. या व्यापारी आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 878 रुपयांनी तर चांदीचा भाव 3202 रुपयांनी कमी झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (24-28 जानेवारी दरम्यान) 24-कॅरेट सोन्याचा दर 48,793 होता, जो शुक्रवारपर्यंत 47,915 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 64,422 रुपयांवरून 61,220 रुपये प्रति किलोवर आला आहे.
IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सर्वसामान्य आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले?
>> 24 जानेवारी 2022- 48,793 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 25 जानेवारी 2022- 48,861 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 27 जानेवारी 2022- 48,528 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 28 जानेवारी 2022- 47,915 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
>> 24 जानेवारी 2022- रुपये 64,422 प्रति 10 किलो
>> 25 जानेवारी 2022- रुपये 63,712 प्रति 10 किलो
>> 27 जानेवारी 2022- रुपये 62,687 प्रति 10 किलो
>> 28 जानेवारी 2022- रुपये 61,220 प्रति 10 किलो
Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?
कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.