Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महाग; एक तोळे सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Gold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महाग; एक तोळे सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Gold Silver Prices: सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 702 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजार 220 रुपयांवर उघडला.

    मुंबई, 13 एप्रिल : सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 35 रुपयांनी किरकोळ महाग झाले आहे. या उडीसह आज सकाळी सोने (Gold Price Today) 52 हजार 913 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Silver Price Today) वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 162 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68 हजार 952 रुपयांवर व्यवहार करत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 702 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजार 220 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 45 हजा 183 रुपये होता. 18 कॅरेटचा सोन्याच भाव 40 हजार 665 रुपयांवर पोहोचला आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 36 हजार 147 रुपयांवर पोहोचला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 70540 रुपयांवर पोहोचला आहे. भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या