खुशखबर, सोन्या-चांदीचे भाव कोसळले, जाणून घ्या किमती

खुशखबर, सोन्या-चांदीचे भाव कोसळले, जाणून घ्या किमती

व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी कमी झालीय.

  • Share this:

मुंबई, 02 मे : या आठवड्यात तिसऱ्यांदा सोने-चांदीच्या किमती खाली आल्यात.  राजधानी दिल्लीत सोन्याचा दर 250 रुपये प्रति 10 ग्रॅमनं 32620 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. मागणी कमी झाल्यामुळे चांदीचा दर  825 रुपयांनी कमी होऊन 37,700 रुपये प्रति किलो ग्रॅम झालाय. व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी कमी झालीय. म्हणून सोन्याच्या किमती कमी झाल्यात.

Amazon सोबत परदेशात वस्तू विकण्याची मोठी संधी, 'ही' आहे पद्धत

नवे भाव - राजधानीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 250-250 रुपयांनी कमी होऊन 32620 रुपये आणि 32450 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. बुधवारी  सोन्याची किंमत 130 रुपये प्रति 10 ग्रॅमनं कमी झालीय. बुधवारी 55 रुपये आणि मंगळवारी 75 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झालीय.

IAS अधिकारी बनण्यासाठी द्याव्या लागतात 'या' परीक्षा

सोनं का झालं स्वस्त? - व्यापाऱ्यांनी सांगितलं की, घरगुती पातळीवर सोन्याची मागणी कमी झाली म्हणून किमती कोसळल्या. त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मजबुतीमुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी झालेत.

UPAच्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली यादी!

चांदीच्या नव्या किमती - चांदीची किंमत 825 रुपयांनी कमी होऊन 37700 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. डिलिवरी बेस्ड चांदीच्या किमती 699 रुपयांनी कमी होऊन 36374 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

VIDEO : नवरदेवाने घेतला उखाणा, पण उदयनराजेंच्या अ‍ॅक्शनने नवरीच लाजली...

First published: May 2, 2019, 5:37 PM IST

ताज्या बातम्या