मुंबई, 28 डिसेंबर : आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. सोन्याचा दर 48200 रुपयांच्या वर कायम आहे. सोन्याचा भाव आज (Gold Rate Today) 84 रुपयांनी वाढून 48,255 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात (Silver rate today) 0.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर आज चांदीचा भाव 62 हजार 420 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
दिल्लीत आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 47 हजार 610 रुपये आहेत. तर दुसरीकडे, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 51 हजार 910 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत आज चांदी देखील चांगलीच महाग झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 62 हजार 500 रुपये आहे, तर काल 1 किलो चांदीचा भाव 62 हजार 300 रुपये होता.
सोन्या-चांदीच्या किमती किती वाढल्या?
सोन्या-चांदीच्या किमती रोज बदलतात. त्याची किंमत दिवसातून दोनदा प्रसिद्ध केली जाते. एकदा सकाळचे दर जाहीर केले जातात, तर संध्याकाळी देखील दुसरी किंमती जाहीर केली जाते. सोमवारच्या तुलनेत सर्व प्रकारच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम
995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 84 रुपयांनी महागलं
995 शुद्धतेचे सोने काल संध्याकाळी 47978 रुपयांवरून 48062 रुपयांवर पोहोचले. कालच्या तुलनेत आज ते 84 रुपयांनी महागले आहे. 916 शुद्धतेचे सोने 77 रुपयांनी महागले आहे. 750 शुद्धतेचे सोने 63 रुपयांनी महागले आहे. 585 शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही मागील दिवसाच्या तुलनेत 49 रुपयांनी वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात 689 रुपयांची वाढ झाली आहे.
यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.