ईडीच्या ताब्यात रग्गड सोनं, चांदी आणि रोकड, अशी झाली कारवाई

ईडीच्या ताब्यात रग्गड सोनं, चांदी आणि रोकड, अशी झाली कारवाई

ईडीने जयपूर, कोलकाता आणि चेन्नईमधून सोनं, चांदी आणि मोठी रोकड जप्त केली आहे. यामध्ये 26 किलो सोनं,12 किलो चांदी आणि 3.75 कोटी रुपयांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : ईडीने जयपूर, कोलकाता आणि चेन्नईमधून सोनं, चांदी आणि मोठी रोकड जप्त केली आहे. यामध्ये 26 किलो सोनं,12 किलो चांदी आणि 3.75 कोटी रुपयांचा समावेश आहे. ईडीने परदेशी चलनही जप्त केलं आहे. जयपूरमधले महाराजा ज्वेलर्स, भगवती ज्वेलर्स, लाडिवाला ज्वेलर्स हे सराफा व्यावसायिक तस्करीचं सोनं विकत घेत होते, अशी माहिती ईडीला मिळाली. चेन्नईमधल्या हर्ष बोथ्रा आणि M/s बंका बुलियन्स प्रा. लिमिटेड या कंपनीकडून ते सोनं घेत होते.

सोन्याचे हे बार कोलकात्यामार्गे जयपूरला आणले जात होते. त्याचबरोबर यासाठी लागणारा पैसे हवालामार्फत ट्रान्सफर केले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर ED ने FEMA कायद्याअंतर्गत तपास मोहीम राबवली आणि 3.75 कोटींची रक्कम जप्त केली. सोन्याचे बार, दागिने हे सगळं मिळून 26 किलो सोनं आणि 12 किलो चांदी जप्त केली. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणंही जप्त करण्यात करण्यात आली.

(हेही वाचा : Air India ची 'घुमो इंडिया' ऑफर, 799 रुपयांत काढा विमानाचं तिकीट)

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 41,565 रुपये प्रतितोळा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 579 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.74 डॉलर प्रति औंस झालीय.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 17th February 2020)

औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीही स्वस्त झालीय. सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 47 हजार 170 रुपये किलो झाली.

10 महिन्यात सोन्याची आयात घटली

भारतात सोन्याची आयात मागच्या वर्षीच्या जुलैपासूनच घटली. मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये यात सकारात्मक वाढ झाली. त्याचवेळी डिसेंबरमध्ये 4 टक्के आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात 31.5 टक्के घट झाली.

====================================================================================

First published: February 17, 2020, 6:43 PM IST
Tags: goldsilver

ताज्या बातम्या