सोनं खरेदी करताय? सावधान! पावडर मिसळून विकलं जातंय सोनं

सोनं खरेदी करताय? सावधान! पावडर मिसळून विकलं जातंय सोनं

सणासुदीच्या दिवसात सोन्याला मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. पण त्याचवेळी सोन्यामध्ये भेसळ करून त्याची विक्री करण्याचाही धोका आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर ही खबरदारी घ्यायला हवी.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : सणासुदीच्या दिवसात सोन्याला मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. पण त्याचवेळी सोन्यामध्ये भेसळ करून त्याची विक्री करण्याचाही धोका आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर ही खबरदारी घ्यायला हवी.

सोन्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर मिसळली जाते. ही भेसळ सोन्याच्या अनेक चाचण्यांमध्येही लक्षात येत नाही. ही सिमेंटसारखी पावडर परदेशातून भारतात येते. याबद्दल ग्राहकांनी त्यांच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत.

सोन्यामध्ये जादा सवलत मिळवणं किंवा लकी ड्रॉ पासून सावध राहा. याआधी फक्त सोन्याच्या चेनमध्येच भेसळ होत होती पण आता ही भेसळ दागिन्यांमध्येही केली जातेय.

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

किंमतीबद्दल राहा सावधान

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

(हेही वाचा : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये नवा बदल, हे आहेत आजचे दर)

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

============================================================================

धगधगत्या जीपखाली अडकली होती इवलीशी पिल्लं, माणुसकीचं दर्शन घडवणारा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 14, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या