Home /News /money /

सोनं खरेदीबद्दल हा नियम पाळला नाहीत तर होईल शिक्षा, उद्यापासून नवा नियम लागू

सोनं खरेदीबद्दल हा नियम पाळला नाहीत तर होईल शिक्षा, उद्यापासून नवा नियम लागू

लग्नसराईच्या या हंगामात तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांबदद्लचा एक नवा नियम जाहीर केला आहे.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : लग्नसराईच्या या हंगामात तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांबदद्लचा एक नवा नियम जाहीर केला आहे.उद्यापासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलं जाणार आहे. त्या दागिन्यामध्ये किती शुद्ध सोनं वापरलं गेलंय हे हॉलमार्किंममुळे कळू शकतं. यासाठी सराफांना लायसन्स दिलं जाणार आहे. ग्राहकांना काय होणार फायदा? केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया सांगतात, देशात सोन्याच्या दागिन्यांचं हॉलमार्किंग करणं याआधी ऐच्छिक होतं. हा नियम लागू झाल्यानंतर सगळ्या सराफांना दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग करणं सक्तीचं असेल. याआधी सोन्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे ग्राहकांना कमी गुणवत्तेचं सोनंही विकलं जात होतं आणि पैसे मात्र शुद्ध सोन्याचे घेतले जायचे. (हेही वाचा : ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं) नियम पाळला नाही तर शिक्षा देशभरात 234 जिल्ह्यांमध्ये 892 हॉलमार्किंग केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. हॉलमार्किंगचा नियम पाळला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. ग्रामीण भागातल्या सराफांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे.तिथे अजून हॉलमार्किंगची केंद्र व्हायची आहेत.त्यासाठी अजून 1 वर्ष लागेल. (हेही वाचा : घर शोधताय? मग दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, सरकारने सुरू केली नवी सेवा) सोन्याचे दर घटले अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक करार होण्याची चिन्हं असल्याने जगभरात सोन्याच्या किंमती (Gold Price Down)खाली आल्या आहेत. याचा परिणाम भारतातल्या बाजारावरही झालाय. सोन्याच्या किंमती 61 रुपयांनी कमी झाल्यात. त्याचवेळी चांदीचे दरही खाली आले. चांदीच्या किंमती 602 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याच्या किंमतींनी 8 जानेवारीला उच्चांक गाठला होता. आता मात्र हे भाव घटले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 40 हजार 422 रुपये प्रतितोळा झालेत. ========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Gold, Money

    पुढील बातम्या